सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रबोधनाची दिंडी

पुणे : राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त राज्यस्तरीय ‘वारी Y-२० : युवासंवाद व पंचप्रण’ या शिबिराचे आयोजन दिनांक ११ जून, २०२३ ते २९ जून, २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या उपक्रमाला १८ वर्षांची परंपरा आहे. गेल्या १८ वर्षात विद्यापीठाने विविध विषयांच्या माध्यमातून वारीमध्ये प्रबोधन केले आहे. विद्यापीठाच्या दिंडीचे हे १९ वे वर्ष आहे. यावर्षी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील २०० स्वयंसेवक या दिंडीत सहभागी झाले आहेत. युवा संवाद आणि पंचप्रण, पर्यावरण संवर्धन, लोकशाही बळकटीकरण, अशा विविध विषयांवर पथनाट्य, भारुड या माध्यमातून यावर्षी स्वयंसेवक जनजागृती करत आहेत.

सासवड येथे संत सोपानकाका यांच्या मंदीराजवळ व एकुणच सासवड शहरात विविध ठीकाणी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वारकऱ्यांनी भारुड, पथनाट्य यामाध्यमातुन प्रबोधन केले आहे. तरुण वारकऱ्यांचा या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही दिंडी यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॅा. सुरेश गोसावी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार राजेश पांडे, राज्यसंपर्क अधिकारी डॅा. राजेश कोठावळे, कुलसचिव डॅा. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. रविंद्र शिंगणापुरकर, बागेश्री मंठाळकर, रासेयो संचालक डॅा. सदानंद भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

See also  भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सुसगाव येथे स्वच्छता अभियान