मुळशी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या CSR निधीतुन साठेसाई ( ता. मुळशी ) या प्राथमिक शाळेला ५००००/- रूपयांचा निधी देण्यात आला.
मुळशीचे माजी सभापती / राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यलक्षी
संचालक अंकुश उभे, जेष्ठ नेते बबन धिडे , माजी पंचायत समिती सदस्य भगवान नाकती , भरत सातपुते ,माजी सरपंच यशवंतराव गायकवाड ,सिताराम धिडे, विभागीय अधिकारी सुरेश नांगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पांडुरंग साठे , उपसरपंच गणपत साठे व ग्रामस्थांनी केले होते.