सुशोभीकरण म्हणजे पुण्याचा विकास नव्हे – आम आदमी पार्टी

शिवाजीनगर : शिवाजीनगर भागामध्ये महानगरपालिका, विद्यापीठ, अभियांत्रिकी कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू आहेत. परंतु या सर्व ठिकाणी नुसताच सुशोभीकरणाचा धडाका चालू आहे. सुशोभिकरण म्हणजे विकास नव्हे.उड्डाणपूल पाडले जात आहेत. मेट्रोचे खांब उभे होत आहेत. नदी रुंदी कमी केली जात आहे. परंतु जनसामान्याचा मुख्यत्वे गोखले नगर जनवाडी वैदुवाडी या भागाचा विकास हा थांबलेला आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद यांनी केला. गोखलेनगर भागातील कुसाळकर चौकामध्ये आम आदमी पार्टीतर्फे स्वराज्य संवाद सभा घेण्यात आली, त्यावेळेस ते बोलत होते

प्रभात ७ आणि १४ मधील निम्मे नगरसेवक गायब आहेत आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. गेले दीड वर्ष प्रशासनाचा कारभार असल्यामुळे तिथे बंद पडलेली ई टॉयलेट, अनेक वर्षे बांधकाम चालू असलेले भाभा हॉस्पिटल, सतत वाहतूक कोंडी झालेला फर्ग्युसन रोड आहे. या भागात एकही सुसज्ज इस्पितळ नाही. त्यावर कोणीही बोलत नाही अशी टीका सनी मुरुडकर यांनी केली. या सर्वच पक्षांच्या बेफिकिरी मुळे आणि बेताल कार्यपद्धतीमुळे आता आम आदमी पार्टी हाच एकमेव पर्याय उरला आहे असं अभिमान विटकर यांनी म्हटले.

दिल्ली आणि त्यानंतर पंजाब मध्ये उत्तम मोहल्ला क्लिनिक उभे करून आणि जगमान्य शाळा उभ्या करून आम आदमी पार्टीने एक आदर्श घालून दिला आहे आणि हे मूलभूत मुद्दे प्रथमच राजकीय मुद्दे बनले आहेत असे डॉक्टर अभिजीत मोरे यांनी सांगितले.निलेश वांजळे यांनी सूत्र संचालन केले.
यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तसेच आपचे अजित फाटके पाटील,सतीश यादव, शंकर थोरात विकास लोंढे, नाज शेख , अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

See also  अपघातात एखादा गेला तर लोक म्हणतात एक देवेंद्रवासी झाला शरद पवारांचा फडणवीस यांना टोला,तर गोवारी हत्याकांड व मावळचा गोळीबारातील मृत्युमुखी पडलेले शरदवासी झाले भाजपाच्या बावनकुळे यांचे प्रतीउत्तर