“यशाची पंचसुत्री वापरून विद्यापीठाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करेन” मा प्रा डाॅ सुरेश गोसावी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसयटीच्या वतीने नवनिर्वाचित कुलगुरू सत्कार समारंभ प्रसंगी प्रा. डाॅ सुरेश गोसावी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्रा. प्राचार्य अनिरुध्द देशपांडे ,श्री ए.के पांडे, उपकार्याध्यक्ष, पी ई सोसायटी,श्री शामकांत देशमुख,कार्यवाह, पी ई सोसायटी, प्रा. श्री सुरेश तोडकर, सहकार्यवाह, पी ई सोसायटी,मा डाॅ सौ जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, पी ई सोसायटी व प्रा. डाॅ निवेदिता एकबोटे उपस्थित होत्या.


कार्यक्रमाची सुरवात स्वाती पटवर्धन यांच्या ईशस्तवनाने झाली.
स्वागत व प्रास्ताविक डाॅ राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, माॅडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर यांनी केले. या प्रसंगी ते म्हणाले,” वेगवेगळ्या आधुनिक शिक्षणामधे संस्था अग्रेसर आहे. या प्रसंगी
माॅडर्न नियतकालिक, माॅडर्न करिअर पाथ, महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल २१-२२ चे प्रकाशन करण्यात आले.
अँनिमेशन व काँम्पुटर सायन्स या विभागांचे उद्धाटन व मा प्रा डाॅ सुरेश गोसावी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. याचबरोबर चित्रपट महर्षी श्री दादासाहेब फाळकॆ क्रोमा सभागृहाच्या अंतर्गत दोन स्टुडिओ आहेत. त्यात अत्याधुनिक सुविधा विद्यार्थांसाठी आहेत. याचे उद्धाटन करताना कौतुक कुलगुरुंनी केले.


प्राचार्य डाॅ अनिरुध्द देशपांडे म्हणाले,” या नविन परिघामधे चांगल्या वातावरणामधे, नविन शैक्षणिक धोरण, स्वायतत्ता या पार्श्वभूमीवर कुलगुरूंना कुलगुरू पदाच्या शुभेच्छा. नविन युवक हा महत्वकांशी आहे. विद्यार्थी संपन्न होण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत”


प्रा. डाॅ सुरेश गोसावी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सत्काराला उत्तर देताना म्हणाले,” पी ई सोसायटीचे व माझे खुप जुने संबंध आहेत.सर्व समावेश,एकत्रीकरण, सुरवात,दृढता,चिकाटी ही पंचसुत्री घेऊन मी विद्यापीठ पुढे नेणार आहे.”
डाॅ गजानन एकबोटे ,कार्याध्यक्ष, पी ई सोसायटी म्हणाले, “सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे मितभाषी व्यक्तिमत्त्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सोन्याचे दिवस घेऊन येतील. आम्ही सदैव अधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. अँनिमेशन मध्ये M SC ही पदवी देणारे महाराष्ट्रातील आमचे एकमेव महाविद्यालय आहे.”
या वेळी रिया कोपार्डे, सिध्दि सोनवणे,पुर्वा वराडे,विराज साळुंके, तेजस्विनी बांगडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्कृती दाभाडे हिने कर्करोगाशी सामना करत ssc परिक्षेत यश मिळवले यासाठी तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
पाहुण्यांचा परिचय डाॅ संजय खरात प्राचार्य माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांनी केला.
विद्यार्थ्यांची नावे उपप्राचार्य डाॅ अंजली सरदेसाई यांनी वाचली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ वैजयंती जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन निगडीत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ प्रवीण चौधरी, माॅडर्न काॅलेज आॅफ फार्मसी यांनी केले.

See also  खासदार संजय राऊत यांची निकालानंतरची प्रतिक्रिया

विद्यापीठाचे पदाधिकारी, याचबरोबर संस्थेचे हितचिंतक याचबरोबर संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, नियामक मंडळाचे सर्व सद्स्य उपस्थित होते.