शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप बाणेर येथील  पूनम विशाल विधाते यांचा अनोखा उपक्रम

बाणेर : शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप बाणेर येथील वामा क्लब च्या पूनम विशाल विधाते यांच्या वतीने करण्यात आले.

बाणेर बालेवाडी येथील महिलांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पूनम विशाल विधाते महिलांसाठी मॅरेथॉन चे आयोजन करत महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती केली. वामा क्लब च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं कार्य करत आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं महिलांना शिक्षणाची दारं खुली व्हावीत म्हणून शालेय साहित्याचं वाटप केले. गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने त्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत जागरुकता येण्यास मदत होईल.

See also  महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी 'मिस, मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट - इंडिया आयकॉन २०२४' फॅशन शो संपन्न