पुणे : ह.भ.प.विश्वासभाऊ नंदकुमार कळमकर आणि सौ.विद्या राजेंद्र बेंद्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन हिंदू युवा प्रबोधिनी व सुरानंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंदर मावळ येथील किवळे,अनसुटे,परिठेवाडी या दुर्गम भागातील गरजु विद्यार्थ्यांना रेनकोट, दप्तरे आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्री.राजेंद्र कुलकर्णी, इतिहास संशोधक श्री.अशोक सरपाटील, पोलिस पाटील पै. किरण शेळके, श्री.नितिन चव्हाण-पाटील, राष्ट्रीय खेळाडू श्री. हनुमंतराव जांभुळकर, शिवव्याख्याते श्री. विनायकराव दारवटकर, राष्ट्रीय खेळाडू श्री. गणेश जाधव, युवाउद्योजक श्री. सचिनदादा ढोरे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे श्री. अक्षयराव भेगडे, कु. शुभम चांदेरे ,कु.रजत कळमकर ,कु.स्वराज निकते यांसह कुटुंबातील इतर सन्माननिय सदस्य उपस्थित होते. सदर उपक्रमाचे संयोजन प्रा. सौ.छायाताई गणेशभाऊ जाधव यांनी केले होते.
सुरानंद फाऊंडेशन
हिंदू युवा प्रबोधिनी