पतित पावन संघटनेच्या वतीने  लाल महाला समोर आंदोलन

पुणे : पतित पावन संघटनेच्या वतीने लाल महाला समोर ISIS चा महाराष्ट्र गटाचा म्होरक्या डॉ.अदनान सरकार च्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी याचे डॉक्टरी पद त्वरीत रद्द करावे ही मागणी करण्यात आली. तसेच पुणेकरांनो सावधान दहशतवादी कोंढव्यात आहेत तुमच्या आमच्या दारात पर्यंत येतील.. खबरदार! अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

निदर्शनाला शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर , मनोज नायर, गोकुळ शेलार,मनोज पवार, विश्वास मणेरे, अरविंद परदेशी, निलेश जोशी, विनोद चौधरी, राजु बर्गे, कुमार पंचलर, हराळे पाटील, अण्णा बांगर, शुभम परदेशी राहुल पडवळ, शशिकांत तोडकर, अक्षय बर्गे, अजय कवटे,सौरभ पवार, दिपक परदेशी आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

See also  सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करापालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश