विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

नवी दिल्ली : राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व आठ आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.

या शिष्टमंडळामध्ये विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ, मंत्री श्री. आत्राम यांच्यासह सर्वश्री सुनील भुसारा, दौलत दरोडा, हिरामण खोसकर, शांताराम मोरे, शिरीषकुमार नाईक, काशिराम पावरा, डॉ.देवराम होळी, राजेश पाडवी व आमश्या पाडवी यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.

या बैठकीनंतर, श्री. झिरवाळ यांनी माध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. आदिवासी समाजातील समस्या मांडाव्यात यासाठी दिल्लीत शिष्टमंडळासह दाखल झाल्याचे सांगितले व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

See also  भोर वेल्हा मुळशीच्या निवडणूक रिंगणात यंदा शिवसेना नाही यामुळे नाराज शिवसैनिकांची भूमिका काय? याबाबत तर्कवितर्क बांधले जात आहेत