कळस येथील स्मशानभूमी दुरुस्त करा – आप ची मागणी

कळस: कळस गावातील स्मशानभूमी मधील दहन करणाऱ्या जागेवरची जाळी अनेक आठवडे तुटली आहे, यामुळे याठिकाणी अंत्यसंस्कार करता येत नाही.
या जागेवर लाकडे रचता येत नाहीत, अनेकदा मयत शरीर खाली घसरते. मागील महिन्यात याबाबत सविस्तर निवेदन देऊनही अजून पर्यंत याठिकाणाची दुरुस्ती झालेली नाही .

कळस स्मशान भूमी मधे मद्यपी, व्यसनी लोकांनी अड्डा करून ठेवला आहे. येथील रूमचे दरवाजे तोडून ते आत बसतात. कोणताही पालिकेचा सुरक्षा रक्षक याठिकाणी रात्री नसतो. येथील सीसीटीवी ही बंद अवस्थेत आहेत. पोलीस विभागाने सुद्धा यावर वेळोवेळी दस्त घालणे गरजेचे आहे.
कळस येरवडा शेत्रिय कार्यालयात मोहल्ला मीटिंग मधे यावेळी आम आदमी पार्टी चे युवा आघाडीचे शहर अध्यक्ष अमित म्हस्के यांनी याबाबत प्रश्न विचारले, लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास आम आदमी पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

See also  10 वीचा पेरिविंकल इंग्लिश मीडियम शाळेची 100% निकालाची परंपरा कायम