“देवू समाजाचं देणं,
समाजसेवेने साजरा करू जन्मदिन” असा निर्धार बॅंकिंग क्षेत्रात चाळीस वर्षे सेवा देवून निवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी यांनी केला

पुणे – बँकिंग क्षेत्रातील प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकार्यांचा स्नेह मेळावा सामाजिक उपक्रमांनी पार पडला. निवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी जगायचे असेल तर जुन्या सहकार्यांना सोबत घेवूनच आनंदाने जंगले पाहिजे आणि समाजसेवा केली पाहिजे असा निर्धार स्नेह मेळाव्या निमित्त करण्यात आले.

बँकेतील निवृत्त अधिकारी रवींद्र भुतकर यांचा जन्मदिन शालेय विद्यार्थांना शैक्षणिक मदत, वृक्षारोपण आणि वृध्दाश्रम, अनाथाश्रमाला भेटी देवून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्यात “देवू समाजाचं देणं,
समाजसेवेने साजरा करू जन्मदिन” असा निर्धार करण्यात आला.
सुनिल बळवंत म्हणाले तब्बल पस्तीस ते चाळीस वर्षे वेगवेगळ्या गावात आणि शाखांमध्ये ग्राहकांना बँकेची सेवा देतानाच आपसात घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले. ते निवृत्तीनंतर दुरावू न देता एकमेकांसाठी सहकार्यासाठी धावून जाण्याचा हा जीवनातील महत्वाचा व अखेरचा टप्पा आहे. निमित्त मिळताच एकमेकांना भेटून संवाद साधा आणि दमदार आयुष्य जगा असे आवाहन केले.


निवृत्ती नंतर सर्वांना भेडसावणाऱ्या अडी अडचणी जाणून घेणे, त्या सोडवण्याकरिता एकमेकांना सहकार्य करणे यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली. त्याचवेळी ज्या समाजामुळे आपण आहोत त्या समाजाचं आपण देणं लागतो त्यासाठी समाजसेवा करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमाने जन्मदीन साजरा करण्याची दिशा या स्नेह मेळाव्यातशने दिल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.
संयोजन सहकार्य नरहरी पोतदार आणि किशोर पारेख यांनी केले.

See also  मांजरी बुद्रुकमधील रेल्वे उड्डाणपुलाला यंदा मुहूर्त नाहीच!भूसंपादन रखडले ; काम पूर्ण करण्यासाठी लागणार ४ ते ६ महिन्याचा कालावधी