कापूरहोळ – मांढरादेवी रस्त्याच्या कामाची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहाणी

भोर : भोर तालुक्यातील कापूरहोळ – मांढरादेवी रस्त्याच्या कामाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी नागरिकांनी काही समस्या मांडल्या, त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याबरोबरच, गुणवत्तापुर्ण काम करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष रवींद्र बांदल, भोर शहराध्यक्ष यशवंत डाळ, विक्रम खुटवड, विठ्ठल शिंदे, संदीप नांगरे, नितीन धारणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष गणेश खुटवड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

See also  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेका निमित्त तब्बल ४२८० किमी सायकल प्रवास करणार मावळे