सुसगाव : सुसगाव येथे मनसे ना नफा ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्र १५०० गणेश मूर्तींच्या भव्य दालनाचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच ना नफा ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्राची माहिती घेतली.
यावेळी बोलताना सुहास भगवानराव निम्हण म्हणाले, “मनसे ना नफा ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्र” गेल्या १५ वर्षांपासून नागरिकांना अखंडित सेवा देत आहे. यासाठी या वर्षी हे केंद्र भव्य अश्या जागेत सुस रस्त्यावरील शिवरत्न लॉन्स शेजारी, सुसगाव या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. तसेच यावेळेस गणेश मूर्ती घेणाऱ्यांसाठी ३०साड्या व ३ पैठणींचा लकी ड्रॉ घेणार आहे.”
याप्रसंगी मनसेचे रणजित शिरोळे, किशोर शिंदे, सुहास निम्हण, मुळशी तालुकाध्यक्ष धनंजय टेमघरे, मुळशी उपाध्यक्ष गणेश शिंदे, विद्यार्थी सेनेचे अनिल मातेरे, उपविभागाध्यक्ष निलेश जुनवणे, पांडुरंग सुतार, अनिकेत मुरकुटे, रमेश उभे, शाखाध्यक्ष जितेंद्र कांबळे, अशोक मराठे, मयूर सूतार, दत्ता रावडे, शिवम दळवी, किरण जाधव, संदीप काळे, रोहिदास चांदेरे, राजेंद्र वेडे, किरण रायकर, शुभम भोसले, मोहन भिलारे, संजय देवकर, अनिल व्हटकर, समीर दहिभाते, सोमनाथ कवडे, हरी दुर्गे, आकाश संसार, बाळा शिंदे, रोहिदास चांदेरे, अनिल नलावडे, महिला हर्षदा नेवसे, मनीषा पसाले परिसरातील मनसे सैनिक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुहास भगवानराव निम्हण, अजय नेवसे, किशोर इंगवले, जय जंगली महाराज प्रतिष्ठान व पाषाणमधील मनसेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी केले होते.