सुस मधील पेरिविंकल मध्ये थेट अयोध्येतील श्रीरामांच्या अमृत कलशा चे आगमन

सुस : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेत आज दि. 23 डिसेंबर 2023 रोजी श्रीरामांच्या अमृत कलशाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकडून स्वागत होऊन शाळेत या अमृत कलशाचे अतिशय उत्साहाने आगमन झाले.
दोन धागे श्रीरामांसाठी विणून झाल्यावर पेरिविंकल च्या सुस शाखेत या अमृत कलशाचे आगमन ही जणू काही एक सुवर्णं संधीच असून भाग्यच आहे.


अयोध्येतील श्री राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून लवकरच मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. यानिमित्ताने देशातभरात आतापासूनच विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दि 22 जानेवारी 2024 रोजी जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला सर्व धर्मगुरुं च्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे . यासाठी अयोध्येहुन एक अमृत कलश प्रत्येक राज्यात पाठविण्यात आला होता. ज्यांना प्रत्यक्ष अयोध्येला जाणे जमणार नाही त्यांनी या कलशाचे पूजन करून व अक्षता अर्पण करून त्या अक्षता अयोध्येत श्रीरामांच्या चरणी अर्पण करून सर्वांना त्या वाटण्यात येणार आहे. या उपक्रमात पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल,सुस च्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी व पालकांसह समस्त ग्रामस्थांनी यात आपले योगदान दिले. कलश पूजन करून रामरक्षा पठन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौं रेखा बांदल यांचा सक्रिय सहभाग होता.

या उपक्रमामुळे भारतीय संस्कृतीचे पालन होऊन मुलांच्या मनात भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवण्यात आला. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामचे वस्त्र विणण्या बरोबरच तेथील अमृत कलशाचे शाळेत आगमन करून पूजन करण्याचे भाग्य पेरीविंकल स्कूलला मिळाले आणि या पवित्र कामास शाळेचा हातभार लागला हा केवळ योगायोग नसून हे खूप पुण्याचे कार्य हातून घडले आहे असे मत शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.राजेंद्र बांदल सर यांनी व्यक्त केले.

या उपक्रमातून विदयार्थ्यांमध्ये सात्विक भाव निर्माण करण्याचा एक प्रयत्न व सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. भगवान रामांच्या अयोध्येतील अमृत कलश थेट पेरिविंकल शाळेत विराजमान झाल्याने त्याचे पूजन करून व रामरक्षा पठन करून पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनाही या सर्व उपक्रमात खारीचा वाटा उचलायला मिळाला ही खरंच भाग्याची गोष्ट आहे.श्रीराम मंदिराच्या कामात आपला देखील हातभार लागावा या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही संधी प्राप्त करून सांस्कृतिक ठेवा जपण्यात पेरिविंकल स्कूलला पुन्हा एकदा योगदान देण्यास या निमित्ताने संधी मिळाली आहे .

दो धागे श्रीराम के लिये विणून झाल्यानंतर या अमृत कलशाचे शाळेत आगमन व त्याचे पूजन झाल्याचे बघून खरोखर आपल्याकडून रामसेवा घडत आहे व ही खूपच भाग्याची बाब आहे असे उद्गार शाळेच्या संचालिका सौ.रेखा बांदल यांनी यावेळी काढले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, सचिन खोडके, सन्मती चौगुले व ज्योती भदौरीया यांच्या सह सर्व शिक्षकवृन्द यांच्या सहयोगाने तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व उत्साहाने करण्यात आले होते.

See also  पुणे मेट्रोच्या प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आढावाप्रकल्पांना गती देण्याचे दिले निर्देश