‘भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा’हे जनतेला अपेक्षित असलेले रामराज्य अजिबातच नाही: मुकुंद किर्दत , आप

पुणे : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


खरे तर 2010 मध्ये याच भाजपने आदर्श सोसायटी घोटाळा झाला म्हणून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते. ही भाजप, ‘ भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न’ दाखवत सत्तेत आली, परंतु आज सिंचन घोटाळा मधले अजित दादा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील छगन भुजबळ तसेच आता आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये सामील करून घेतले आहे. या सर्वच ‘ भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा ‘ हे अगदी समर्पक आहे. आता भाजप नेते ‘ आदर्श घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत ‘ असे म्हणत आहेत. मग आरोप सिद्ध नसताना भाजपा नेच अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला मात्र भाग पाडले, सिंचन घोटाळा संदर्भातही अजित दादांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले होते. त्यामुळे आता भाजपाचे खरे रूप उघड होते आहे. भाजप हा सत्तेसाठी काहीही करणारा पक्ष झाला आहे असा टोला आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी लगावला आहे.


हे जनतेला अपेक्षित असलेले रामराज्य अजिबातच नाही उलट आम आदमी पार्टी या सर्व काळामध्ये सीबीआयच्या, ईडी मार्फतच्या भाजपच्या सर्व दबावाला पुरून उरली आहे. शिक्षण आरोग्य योजना राबवत सुराज्य स्थापित करीत आहे. भविष्यकाळ या लढवू आम आदमी पार्टी चाच असेल. आता जनतेलाच मत पेटी द्वारे भ्रष्टाचारी कोण हे ठरवण्याची संधी आहे असेही मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

See also  जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ केंद्र स्थापन,पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात