पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऐतिहासिक पथ संचलन केले. भारत माता की जय आणि वंदे मातरमने परिसर दुमदुमला.
पुणे विद्यापीठाच्या विविध केंद्रांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते.
विजयादशमीच्या दिवशी, १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. संघाच्या स्थापनेला या वर्षी 99 वर्षे पूर्ण झाली असून, शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. या उपलक्ष्यात संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी दुपारी 4 वाजता विद्यापीठ कॅम्पसमध्ये पथ संचलनाचे आयोजन केले. पूर्ण गणवेशात घोषच्या धुनवर राष्ट्रभक्तीचे गीत गात, स्वयंसेवकांनी संपूर्ण विद्यापीठ परिसराची परिक्रमा केली.
संचलनादरम्यान विद्यापीठ भाग संघचालक श्री. सूभाष कदम, प्रांत महाविद्यालयीन प्रमुख श्री. सचिन काळे, महानगर प्रचारक श्री. केदार कुलकर्णी, अधिसभा सदस्य श्री. शंतनु लमधाडे आणि श्री. कृष्णाजी भंडल उपस्थित होते. तसेच भारतीय कामगार संघटनेचे श्री. शिवाजी अण्णा उत्तेकर उपस्थित होते.