विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मध्ये  ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची उत्साहात सुरुवात

*विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मध्ये ४ मार्च ते ११ मार्च २०२४ दरम्यान ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची उत्साहात सुरुवात  करण्यात आली. ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा ध्वजारोहण हिंजवडी पोलीस स्टेशन चे असिस्टंट पोलीस निरीक्षक श्री. राम गोमारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कंपनीचे आधारस्तंभ श्री. विलास जावडेकर  व कंपनीमधील सर्व कर्मचारी व कामगार वर्ग या ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होते.

सुरक्षिततेचे महत्व व समाजा मध्ये सुरक्षिततेची जनजागृती व्हावी य उद्देशाने   या सप्ताहात कंपनीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजने अंतर्गत २५० बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर श्री राम गोमारे  व विलास जावडेकर यांनी  इमारतींचे बांधकाम करणारे कामगारांनी घ्यावयाची दक्षता व  सुरक्षिततेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

See also  कोथरूड मतदार संघातील सुस रोडचा कचरा प्रकल्प हलवणे जे चंद्रकांत दादांना जमले नाही ते अजित दादा करतील का?