पुणे : केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवर श्रेयवाद करणारी पंतप्रधान मोदींचा फोटो असलेली पोस्ट त्यांच्या फेसबुक अकाउंट वर टाकण्यात आले. भारतीय सैन्याच्या शौर्याचे श्रेय घेणारी ही पोस्ट नेटकर यांना मात्र आवडली नाही. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पोस्टवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या फेसबुक पेजवर
“जेव्हा देशात मजबूत सरकार असतं…
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळात ज्या-ज्या वेळी दहशतवादी हल्ले झाले. त्यावेळी भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र काँग्रेसचे सरकार असताना असं झालं नाही…” या आशयाची पोस्ट टाकण्यात आली.
काँग्रेसच्या कालावधीत झालेले देशावरील हल्ले व भाजपाच्या कालावधीत झालेले देशावरील हल्ले याबाबत तुलना पोस्टच्या माध्यमातून करण्यात आली. देशावर होत असलेला हल्ल्यासाठी देश एकात्मतेच्या भावनेने सैन्य दल व सरकारच्या पाठीशी उभा असताना जबाबदार खासदार व केंद्रीय मंत्री यांच्याकडून अशा पद्धतीची तुलना होणारी पोस्ट टाकण्यात आल्याने अनेकांनी पोस्टवर नाराजी व्यक्त करत खासदारांवर टीकेची झोड उठवली.
