उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांकडून भाजपाचा अनोख्या पद्धतीने विरोध

पाषाण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शहर उपाध्यक्ष यांनी आम्ही का करावे मतदान? असा प्रश्न उपस्थित करत पाषाण परिसरामध्ये कामे झाली नसल्याने अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा व भाजपा सत्ताधाऱ्यांचा विरोध केला आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित खानेकर व समीर उत्तरकर यांनी पाषाण परिसरामध्ये प्रलंबित कामांचा बॅनर लावत आम्ही का करावे मतदान असा प्रश्न उपस्थित केला आहे. पाषाण परिसरामध्ये नगरसेवक आमदार खासदार यांचे दर्शन होत नसल्याचे मत बॅनरद्वारे मांडले आहे.

तसेच साड्या भेट वस्तू व जेवण देणारे लोकप्रतिनिधी नको तर आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत अशी टीप या बॅनर वर देण्यात आले असून वर्षभरामध्ये आमदार व नगरसेवक यांच्याकडून होत असलेल्या विविध वाटपावर बॅनरद्वारे सडकून टीका करण्यात आली आहे.

सध्या भाजपा व अजित दादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महायुतीमध्ये असून देखील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पाषाण परिसरात असे बॅनर झळकत असल्याने महायुतीला स्थानिक पातळीवरच विकास कामात लक्ष न घातल्याने घरचा आहेर दिला जात असल्याचे चित्र पाषाण परिसरात पाहायला मिळत आहे.

See also  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार , नागरिकांना लाडू वाटप व बाल मेळावा आयोजन