विजय डाकले यांनी केला नऊ रिक्षा चालकांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ, त्यांना “रिक्षा” हे चिन्ह मिळाले आहे

कोथरूड : कोथरूड मतदार संघातील अपक्ष उमेदवार विजय डाकले यांनी आज आपला प्रचाराचा नारळ फोडला. विजय डाकले
रिक्षा चिन्हावर निवडणूक लढवत असून आज त्यांनी कोथरूड भागातील नऊ रिक्षा चालक प्रमुखांना बोलवून त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी विजय डाकले यांनी स्वतः रिक्षा चालवत प्रचाराला सुरुवात केली.


महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय डाकले हे पदाधिकारी आहेत. महायुतीत भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विजय डाकले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीत बंडखोरी झाल्याची चर्चा कोथरूड मतदार संघात आहे.

विजय डाकले यांनी रिक्षा निवडणूक चिन्ह असल्याने रिक्षाची पूजा करत आपला प्रचार सुरू केला. यावेळी कैलास कदम, तात्या कसबे, अशोक जाधव, मोहन अवळे, समाधान जाधव, संतोष शेंडगे, नवनाथ कांबळे, नामदेव फुलवळे, दीपक सगर, सागर कसबे, विजय बगाडे, सयाजी कदम, हरिभाऊ कसबे, सचिन डाकले, ओंकार शिंदे, आकाश काटे उपस्थित होते.


रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर रिक्षाचालक रिक्षा निवडणूक चिन्ह घेऊन कोथरूडचा आमदार ही होऊ शकतो असा विश्वास विजय डाकले यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधकही माझ्या निवडणुक चिन्ह असलेल्या रिक्षाच्या माध्यमातूनच आपला प्रचार करता करता माझाही प्रचार करत आहेत असा निशाणाही डाकले यांनी विरोधी उमेदवारांवर साधला आहे.

See also  राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला