भाजपचा खोटा प्रचार रोखण्यासाठी टीम उभी करा-निरंजन टकले

पुणे – भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकार यांचा खोटा प्रचार खोडून काढण्यासाठी काँग्रेसने टीम उभी करून रणनीती आखावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी आज (शुक्रवारी) काँग्रेस भवनात बोलताना केले.

भारत जोडो अभियानाचे समन्वयक प्रशांत कोठडिया यांनी टकले यांच्या काँग्रेस भवन भेटीचे आयोजन केले होते. या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे, संग्राम खोपडे, भारत जोडो अभियानाचे संदीप बर्वे, ॲड.संदीप ताम्हणकर उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी टकले यांच्या सूचनेनुसार टीम उभी केली जाईल, असे अरविंद शिंदे यांनी सांगितले. शाल आणि तिरंगी पट्टी देऊन शिंदे यांनी निरंजन टकले यांचे स्वागत केले.

See also  मराठी भाषेसाठी धानोरी येथे दुकानदाराला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा खडकी कोर्टातून जामीन मंजूर