बाणेर परिसरात रवींद्र धंगेकर यांच्यासाठी प्रचार

बाणेर : पुणे लोकसभा महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराची परिचय पत्रके  कोथरूड मतदार संघातील प्रभाग क्र. ९ मधील दर्शन पार्क,विधाते वस्ती,दत्तनगर,विजया नगर,स्वामी विवेकानंद नगर आणि शारदा पार्क येथे वाटून मतदारांशी संवाद साधला.

यावेळी मा.आमदार दिप्तीताई चवधरी,माजी नगरसेवक कैलास गायकवाड, माजी नगरसेवक शिवाजीराव बांगर, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव व  प्रभागातील प्रमुख दत्ता जाधव ,स्नेहल बांगर, रोहित धेंडे, ओम बांगर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले.

यावेळी नागरिकांनी महागाई, बेरोजगारी, सिलेंडरचे वाढलेले दर, भ्रष्टाचार आदी विषयांवर संवाद साधला.

See also  दहशतवाद्यांनी हिंदूंना नव्हे भारतीयांना मारले : राहुल डंबाळे; नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी तर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्या विरोधात कॅण्डल मार्च व निषेध सभा