मोदी सरकार विरोधात पुण्यात आम आदमी पार्टीची निदर्शने

पुणे : दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे, बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पुण्यात झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर बालगंधर्व चौक येथे आज आम आदमी पार्टीतर्फे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय बदल्या व नियुक्ती करण्याचे अधिकार काढून घेत आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आम आदमी पार्टी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तब्बल आठ वर्ष ही लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाच्या बेंच ने हे सर्वाधिकार पुन्हा एकदा दिल्लीतील लोकनियुक्त केजरीवाल सरकारकडे राहतील असा ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु केंद्रातील भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागल्या दिवशी एक अध्यादेश काढत हे अधिकार पुन्हा आपल्या हातात घेतले आहेत. हा अध्यादेश दिल्लीतील मतदारांचा अवमान करणारा असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज निदर्शने करण्यात आल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये 70 पैकी 62 विधानसभा जागा जिंकून आम आदमी पार्टीने जनतेची कामे सुरू केली. परंतु त्यात केंद्र सरकार नियुक्त राज्यपालांमार्फत सतत हस्तक्षेप केला जात असून लोकांची कामे अडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आता अध्यादेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजप सरकार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टी राज्यसभेमध्ये इतर सर्व विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुप्रीम कोर्टाने आप सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही ह्या अध्यादेशाच्या मार्गे बदली, नियुक्तीचे अधिकार मोदी सरकारने आपल्याकडे घेतले आहेत याचा काळी फीत लावून निषेध केला गेला. याप्रसंगी किशोर मुजुमदार, धनंजय बेनकर, इक्बाल तांबोळी, फाबियन अण्णा सॅमसन, चंद्रशेखर पानसे, मनोज शेट्टी, संजय कटारनवरे, चंद्रकांत गायकवाड, किरण कद्रे, सहील परदेशी, अनिल कोंढाळकर, समीर अरवडे, रशिदा सिद्दिकी, तहसीन देसाई, सुनीता काळे, वैशाली डोंगरे, सुरेखा भोसले, निलेश वांझळे, संदीप सोनावणे, सतीश यादव, राजेंद्र साळवे, गंगाधर खरात, सीमा गुट्टे, सय्यद अली, अजय पैठणकर, शिवाजी डोलारे, आनंद अंकुश, शमीम पठाण, संतोष राऊत, गणेश थरकुडे, शंकर थोरात, प्रशांत कांबळे, डॉ अभिजित मोरे, राजू परदेशी, धर्मेंद्र डोंगरे, समीर पुराणिक, श्रीकांत चांदणे, तानाजी शेरखाने, अमोल मोरे, योगेश इंगळे, शंकर पोटघन, अक्षय दावडिकर, घनश्याम मारणे, सर्फराज मोमीन, कुमार धोंगडे, शेखर ढगे, अल्ताफ शेख, अमित म्हस्के, अंजली इंगळे, रामभाऊ इंगळे, रुबिना काझमी, अक्षय सुतार, आसिफ मोमीन, मुकुंद किर्दत, विष्णू भोगे, ऋतिका इंगळे, अक्षय म्हस्के, गणेश ढमाले, प्रीती निकाळजे, सुनीता पोखरे, माया शिंदे, शोभा जात्वरकर, वैशाली साळवे, सुनीता डेकने, रेखा गायकवाड, परू बोकरे, कांचन शर्मा, दत्तात्रेय कदम, संजय कोणे, मनोज फुलावरे, उत्तम वडावराव, किरण कांबळे उपस्थित होते.

See also  दिग्गजांच्या कलाविष्काराने सजणार 'दगडूशेठ' गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव