महात्मा फुले जयंती निमित्त बाणेर मध्ये 102 जणांनी केले रक्तदान

बाणेर  : अखिल बाणेर गाव महात्मा फुले जयंती उत्सव समिती तर्फे महात्मा फुले जयंती निमित्त व युवा मित्र स्व. प्रतीक भुजबळ यांच्या स्मरणार्थ बाणेर गावात भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 102 रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.


प्रथमतः क्रांतिसूर्य म. फुले यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदा वसंत भुजबळ, ज्ञानेश्वर तापकीर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, गणेश कळमकर , प्रल्हाद सायकर , पूनम विधाते , विशाल विधाते, संजय मुरकुटे, शेखर सायकर, समीर चांदेरे, राहूल बालवडकर ,अमोल बालवडकर, लहु बालवडकर, बाबुराव चांदेरे, जंगल रनवरे, अर्जुन ननावरे, प्रकाश बालवडकर आदी उपस्थित होते.
शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून 102 दात्यांनी रक्तदान करत समाजाप्रती आपली बांधिलकी जपत गरजवंतांना मदतीचा हात पुढे केला.

See also  विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज