झाडाभोवती गुंडाळलेल्या लाइटिंग वर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई

औंध : औंध टेलिफोन एक्सचेंज जवळ झाडाच्या वाढीसाठी धोकादायक ठरत असलेल्या अनधिकृत शुभेच्छा लाइटिंग पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करुन काढण्यात आल्या.

औंध टेलिफोन एक्सचेंज जवळ तसेच ॲक्सिस बँक जवळ झाडावरील लाइटिंग करण्यात आल्या होत्या. यामुळे झाडांवर ठोकण्यात आलेले खिळे तसेच झाडांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

सुशिक्षित करण्याच्या नावाखाली झाडांवर लाइटिंग करण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्यांवर गुंडाळलेली लायटिंग यामुळे झाडाच्या वाढीला होत असलेला अपाय यावेळी वृक्षप्रेमी नागरिकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून देत कारवाईची मागणी केली होती. यावर कारवाई करत औंध क्षेत्रीय कार्यालय च्या वतीने तातडीने कारवाई करत झाडाभोवती गुंडाळलेल्या शोभेच्या लाइटिंग काढण्यात आल्या.

See also  काँग्रेसचे विश्रांतवाडी ब्लॉकचे अध्यक्ष विकास टिंगरे यांची गळफास घेऊन आत्महत्या