पाषाण : पाषाणमध्ये राजमाता जिजाऊ यांची ४२७ वी जयंती राजे शिवराय प्रतिष्ठान द्वारे साजरी करण्यात आली. जिजाऊ जयंती साजरी करण्याचे यंदाचे ९ वे वर्ष होते. या वेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी देवाचीचे विश्वस्त परम पूज्य सदगुरु योगी निरंजननाथ महाराज यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीतून राजमाता जिजाऊ यांचे संस्कार घरोघरी रुजविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यापीठ भाग संघचालक सुभाष कदम हे असून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेल्या छाया रणपिसे यांनी सुद्धा आधुनिक जिजाऊ कशा असाव्या यावर प्रबोधन केले. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने राजे शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक महेश पवळे यांनी कार्यकर्त्यांचे प्रबोधन करून प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देऊन समाजासाठी आणि देव देश धर्मासाठी राजे शिवराय प्रतिष्ठान सदैव कार्य करत राहील असे आश्वासन दिले.
तसेच कु.लता रामावत हिला कांस्य पदक पटकाविले बद्दल विशेष सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अतुल गोणते ,सनी येळवंडे ,अक्षय भेगडे, हर्षल तापकीर, संदीप तुपे, अजय निम्हण, सुनील भाले ,महेंद्र रणपिसे, शुभम चांदेरे, शुभम निम्हण ,नितिन राठोड ,चैतन्य सुतार, अजिंक्य सुतार यांनी केले.