धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपला रामराम

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील पक्षांतर्गत तिढा सोडविण्यास भाजप नेतृत्वाला अपयश आले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपला रामराम ठोकला.

भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. माजी उपमुख्य मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. समर्थकांच्या बैठका घेतल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. स्वतः धैर्यशील पाटील यांनी पवार यांची पुण्यात भेट घेतली आणि त्यानंतर भाजपचा राजीनामा दिला. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

गेल्या आठवड्यात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्यानंतर मोहिते पाटील यांचा राजीनामा भाजपला धक्का मानला जातो.

See also  प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित- मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे