शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हे तर बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून खा.डॉ. अमोल कोल्हे तर बारामती मतदार संघातून खा. सुप्रिया सुळे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.  

या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज  पुणे विधानभवन येथे माजी मंत्री श्री. बाळासाहेब थोरात साहेब, माजी राज्यमंत्री श्री. विश्वजित कदम, आ.अशोकबापु पवार, आ.सचिन अहिर, आ.संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, माजी आ. महादेव बाबर, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे बंधू मा. श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजित दादांचे  पुतणे श्री. युगेंद्र पवार या सर्वांच्या विशेष उपस्थितीत दाखल केला.

See also  पीएनजीआरबीच्या राष्ट्रीय मोहिमेत एमएनजीएलचाही सक्रिय सहभाग