तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी आहे – चंद्रकांतदादा पाटील ; कोथरूड मधील कार्यकर्त्यांना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे साष्टांग दंडवत

कोथरूड : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सातत्याने सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले. प्रसंगी कुटुंबियांचाही रोष पत्करून काम केले, त्यामुळे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी साष्टांग दंडवत घालत सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कोथरुड विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मंडल कार्यालयात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचेही आभार मानले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील विजयासाठी गेले महिनाभर रात्रंदिवस सर्व‌ कार्यकर्ते एक दिलाने झटत होते. प्रसंगी कुटुंबियांचा रोष पत्करून देखील काम करत होते. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच हा ऐतिहासिक विजय साकार झाला. त्यामुळे तुम्हा सर्वांचा ही मी शतशः आभारी आहे. तसेच, गेले महिनाभर तुम्हाला साथ देणाऱ्या कुटुंबियांचे ही मनापासून आभार मानतो.

See also  महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पुणे पोलिस आयुक्तांचा सन्मान