केंद्रीय तपास यंत्रणांना सुप्रीम कोर्टाची चपराक; आम आदमी चा विजय

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाकडून दिल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका करून केंद्रीय तपास यंत्रणांना धक्का देत भाजप तसाच तपास यंत्रणांचा खोटेपणा उजेडात आणला. भाजपच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांनी ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्या प्रकारची प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रींग ऍक्ट (PMLA) नुसार नवव्या समन्स नंतर अटक केली होती. ही अटक म्हणजे भाजपाच्या इशाऱ्यावर अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचारापासून रोखण्याची एक चाल होती.

सुप्रीम कोर्टाने अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे सादर करण्यास सांगून देखील तपास यंत्रणा कोणताही पुरावा सादर करू न शकल्याने आज अरविंद केजरीवाल यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. खरे पाहता याच कायद्याच्या आधारे मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या “आप” च्या दोन मंत्र्यांना देखील अटक करण्यात आली असून गेल्या दीड वर्षापासून ते तिहार जेलमध्ये आहेत. त्यांच्या विरोधातही कोणताही सबळ पुरावा अद्याप केंद्रीय तपास यंत्रणा सादर करू शकले नाही किंवा घोटाळ्याची मनीट्रेल सिद्ध करू शकले नाहीत. आम आदमी पक्ष हा भारताच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारा पक्ष असून त्याला जर रोखायचे असेल तर त्याच्या नेत्यांना खोट्या आरोपाखाली अटक करायचे हेच तंत्र भाजपने अवलंबले होते आणि त्यानुसार कटकारस्थाने करत तसेच तपास यंत्रणांना हाताशी धरत आप च्या प्रमुख तीन नेत्यांना PMLA सारख्या कायद्यानुसार अटक केले होते.

PMLA सारख्या कायद्यात ज्या ठिकाणी जामीन मिळणे देखील खूप कठीण आहे त्या ठिकाणी आज अरविंद केजरीवालांना 40 दिवसानंतर जामीन मिळाल्याने न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक वाढेल अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिक देखील आता नक्की विचार करतील की चूक कोणाची होती? आणि शिक्षा कोणाला झाली? केजरीवाल जेलमध्ये असताना त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलतानाच केजरीवाल हा केवळ एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे हे संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.

See also  वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपाने मागील 10 वर्षात फोडाफोडीचे तसेच दबाव तंत्राचे राजकारण करत लोकशाहीला संपवण्याचा खेळ सुरू केला आहे, त्याला जनतेच्या वतीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीतून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल आणि इंडिया आघाडीचा विजय होईल असे मत आम आदमी पक्षाच्या वतीने मांडण्यात आले.