नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

बालेवाडी : बालेवाडी येथे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात करण्यात आले.

यावेळी मा. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच अमोल बालवडकर यांच्या वतीने होत असलेल्या विकासकामांचे कौतुक करून जनतेसाठी सुरू केलेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून समस्त नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील ही सदिच्छा व्यक्त केली. विविध मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली याबद्दल नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील, माजी भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस श्री. पुनीत जोशी, भाजपा पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी, युवावर्ग, मित्रपरिवार, परिसरातील विविध सोसायटींमधील नागरिक तसेच बाणेर- बालेवाडी- सुस- म्हाळुंगे- पाषाण- सोमेश्वरवाडी- औंध मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ