दिव्यांग बांधवांना पेन्शन साठी हयातीचे दाखले वाटप

मांजरी : दिव्यांग कल्याण केंद्र मांजरी बुद्रुक येथे पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्या वतीने 60 टक्के वरील दिव्यांग बांधवांना पेन्शन योजना चालू राहावी यासाठी हयातीचे दाखले देण्यात आले.

यामुळे दिव्यांग बांधवांना दर महिना दोन हजार रुपये पेन्शन मिळण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जनाधार दिव्यांग संस्थेच्या वतीने दिव्यांग कल्याण केंद्र येथे करण्यात आले होते.

See also  शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील