कोथरूड मधील बेकायदेशीर जड वाहतूक विरोधात कारवाई होत नसल्याने आम आदमी पार्टीचे आंदोलन; सिमेंटचे मिक्सर पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

पुणे : कोथरूड मधील रहदारीच्या भागांमध्ये दिवसाढवळ्या बेकायदेशीर जड वाहतूक (डम्पर, ट्रक, मिक्सर) चालू आहे. कोथरूडमध्ये अनेक सर्वसामान्य लोकांचा जीव जात असून सुद्धा इथले प्रशासन, पोलीस कोणती कारवाई करत नाही. या विरोधामध्ये  कर्वे पुतळा परिसरामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

अनेक जड वाहतूक करणाऱ्या डंपर, मिक्सर अडवून त्यांची वाहतूक यंत्रणेमार्फत तपासणी करायला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना भाग पाडले.

कोथरूड मधील चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर अण्णा मोहोळ, मेधाताई कुलकर्णी यांसारखे लोकप्रतिनिधी काय करत आहेत? प्रशासनावर यांचा वचक राहिला नाही का? कोथरूडकरांचा जीव स्वस्त झाला आहे का? असे प्रश्न यावेळी आम आदमी पार्टी चे डॉ. अभिजीत मोरे यांनी मांडत कारवाईची मागणी केली.

यावेळी कोथरूड येथील कर्वे पुतळ्याजवळ जड वाहतूक करणारे मिक्सर पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

See also  काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान