रविंद्र धंगेकरच पुण्याचे खासदार होतील! – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हेच खासदार होतील. एक्झिट पोलचे अंदाज चुकतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

लोकसभेची निवडणूक पुणेकरांनीच हाती घेतली होती, प्रचारात त्याचा आम्हाला पदोपदी अनुभव आला. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने धंगेकर यांचा प्रचार केला. पदयात्रा, कोपरा सभा यामधून सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे भेटून धंगेकर यांना पाठिंबा देत होते आणि धंगेकरच खासदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून पुणेकरांची इच्छा पूर्ण झाल्याचे दिसून येईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचे भाजपचे राजकारण, पंतप्रधान मोदी यांची कार्यपद्धती आणि हुकूमशाहीवृत्ती, महागाई, बेकारी याबद्दल पुणेकरांमध्ये प्रचंड नाराजी होती. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत गेली १० वर्षे सत्ता असूनही भाजपकडून पुण्यासाठी एकही भरीव योजना राबवली गेली नाही, किंबहुना विकासाची वाट लागली. याबद्दल पुणेकरांच्या मनात असलेला संताप मताद्वारे व्यक्त झाला आहे. पुणेकरांनी खासदार म्हणून रविंद्र धंगेकर यांना स्वीकारले आहे. एक्झिट पोलचे अंदाज अनेकदा चुकले आहेत. याहीवेळी अंदाज चुकलेलेच दिसतील. धंगेकर खासदार झालेले असतील, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

See also  औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून नववर्षाच्या स्वागतासाठी घाणीच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी