समन्वय ठेऊन मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडा– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. ३: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम कोरेगाव पार्क येथील पुणे व बारामती लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र, शिवछत्रपती क्रीडा संकुल वेटलिफ्टींग हॉल बालेवाडी येथील मावळ लोकसभा  मतदार संघ मतमोजणी केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोदाम  रांजणगाव (कारेगाव) येथील शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप आयुक्त वर्षा लढ्ढा- उंटवाल,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.  

मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षात करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी केंद्रातील केलेल्या तयारीची तसेच व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली.

See also  गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप