सुसज्ज प्रसूतिगृहासह होमी भाभा रुग्णालयदीड महिन्यात सुरू होईल -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – महापालिकेच्या होमी भाभा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होत आले असून, येत्या दीड महिन्यात सुसज्ज प्रसूतिगृहासह लोकांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी आणि परिसरात सर्व सोयींनी युक्त तसेच सर्वसामान्यांना परवडणारे प्रसूतिगृह, बाह्यरुग्ण विभाग व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार महापालिकेने अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या नावाने रुग्णालय उभे करण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी या नात्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्याशी आज (मंगळवारी) चर्चा करून कामाचा आढावा घेतला. येत्या दीड महिन्यात रुग्णालय सुरू होईल, अशी माहिती चर्चेत देण्यात आली. असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

या तीन मजली रुग्णालयात तळ मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर आणि तिसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह विभाग असेल. रुग्णालयात प्रसूति आणि उपचार यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाणार आहे. या रुग्णालयामुळे वडारवाडी आणि आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्य सुविधेची सोय होणार आहे.

See also  यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी रोड, धनकवडी येथे मोफत श्रवणयंत्र तपासणी व चष्मे वाटप