औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये कर आकारणी कमी करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणाऱ्या दोघांना अटक

औंध : औंध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये घराची कर आकारणी कमी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन जणांना लाचलुचपत विभागाच्या वतीने कारवाई करत अटक करण्यात आली.

सुमित राजेंद्र चांदेरे वय- 28 राहणार सुसगाव व प्रशांत शिवाजी घाडगे वय 32-राहणार सांगवी हे दोघेजण निरीक्षक म्हणून औंध क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत होते. बाणेर येथील रहिवासी सुधाकर एकनाथ सांडभोर वय 70 यांच्याकडे घराची कर आकारणी कमी करण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार 25 हजार रुपये सांडभोर यांनी चांदेरे यांच्याकडे दिले. दरम्यान सुधाकर सांडभोर यांनी लाच लचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती.
अँटीकरप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सापळा रचून कारवाई करत मुद्देमालासह दोघांना अटक केली.

लाच रक्कम घेण्यासाठी चांदेरे यांनी क्षेत्रिय कार्यालयातील सेवक पार्किंग मध्ये चांदवड यांना घेऊन जात 25 हजार रुपयांची लाच स्वीकारून उजव्या खिशात ठेवली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा केल्यानंतर तातडीने चांदेरे याला पकडण्यात आले. रकमेची खात्री झाल्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला.

See also  सिहंगड आणि परिसरात मिळाल्या प्राचीन कालीन मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा-डॉ. नंदकिशोर मते यांचा शोध.