औंध येथे कै.समीर राय चौधरी यांच्या वरील हल्ल्या प्रकरणी नागरिकांचा कॅण्डल मार्च

औंध : औंध येथे गुन्हेगारांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिक स्व. समीर रॉय चौधरी यांच्या साठी कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाचा केला जाहीर निषेध करण्यात आला.

गुरुवार दिनांक 13 जून 2024 रोजी सकाळी 5:15 वाजता मॉर्निंग वॉक करत असतानी गुन्हेगारांच्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप स्व. समीर चौधरी यांच्यासाठी ॲड डॉ मधुकर मुसळे यांनी नागरिकांना कॅण्डल मार्च साठी आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन औंध मधील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. या कॅन्डल मार्च मध्ये स्व. समीर रॉय चौधरी यांची पत्नी , मुलगा , भाऊ यांच्यासह नगरसेविका अर्चना मुसळे व औंध मधील शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन शांततेने कॅन्डल मार्च केला.

गुरुवारी घडलेल्या पहिल्या घटनेपासून (पूर्विका स्टोअर संघवीनगर औंध ) समीर रॉय चौधरी मृत्युमुखी पडलेल्या वेस्टर्न मॉल कॉर्नर पर्यंत कॅण्डल मार्च करण्यात आला. कॅन्डल मार्च शेवटी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी घडलेल्या संपूर्ण घटनेची व पोलीस तपासातील प्रगतीची माहिती दिली.

औंध सुशिक्षित उच्चशिक्षित व शांतताप्रिय भाग आहे या झालेल्या घटनेने औंध मधील नागरिक घाबरून गेले असून यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्ताची व्यवस्था करावी तसेच बालगुन्हेगार असो अथवा सज्ञान असो त्यांचा कायमचा बंदोबस्त करून त्यांच्यावर वचक निर्माण करावा व नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना पुन्हा निर्माण करवी.

पोलीस प्रशासनाने यापुढे कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवून कुठली अप्रिय घटना होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी अशी मागणी ॲड. डॉ.मधुकर मुसळे यांनी केली.

नगरसेविका अर्चना मुसळे यांनी नागरिकांना संबोधित केले व नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही 24 तास तत्पर सेवेत उपलब्ध आहोत अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी अनेक नागरिकांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पोलीस प्रशासनाच्या निष्काळजी व डिसाळपणामुळे स्व. समीर रॉय चौधरी या निष्पाप नागरिकाच्या जीव गेला अशी भावना व्यक्त केली.

See also  राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे पुणे म.न.पा. ला नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी एकही झाड न कापण्याचे स्पष्ट आदेश.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  शैलेश संखे  यांनी नागरिकांना संबोधित केले व औंध पूर्वीप्रमाणेच शांततामय व गुन्हेगारी मुक्त राहील असे आश्वासन दिले.