पाषाण : येथील लोकसेवा स्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.दैनंदिन योगामुळे शरीर निरोगी राहण्यास व रोगमुक्त होण्यास मदत होते. तसेच, शरीराला सकारात्मक ऊर्जा व उत्साह मिळतो. यासाठी दैनंदिन कामातून थोडा वेळ काढून सर्वांनी योगा करून आपले आरोग्य जपावे, असे आवाहन राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
राहुलदादा कोकाटे मित्र परिवार व लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात ते बोलत होते. यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिपक पायगुडे, श्री रत्नाकर मानकर,श्री रघुनाथ उत्पात, श्री विद्याधर देशपांडे,श्री विनोद दीक्षित,श्री जनक टेकाळे, शालेय विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योगगुरू रामदास ठोसर यांनी योगाचे महत्त्व आणि जीवन यावर मार्गदर्शन केले. तर राजकिशोर त्रिपाठी, सीमा सिंग यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
योग शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणते. आपल्या रोजच्या समस्यांना तोंड देण्यास मदत करतो. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. त्यामुळे सर्वांनी नियमित योग करावा.असे श्री राहुल कोकाटे यांनी या निमित्त प्रतिपादन केले,सौ मयुरी कोकाटे यांनी आभार प्रदर्शन केले..