पाषाण : बाणेर येथिल श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत पंचक्रोशीतील आदरणीय महाराष्ट्र भूषण मृदंग वादक गुरुवर्य ह.भ.प. श्री पांडुरंग अप्पा दातार यांना त्याच्या आरोग्य विषयी समसेंसाठी रू. ५१०००/- निधी अप्पांच्या निवासस्थानी जाऊन आदर पूर्वक सुपूर्द करण्यात आला.
बाणेर येथिल श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये नावाजलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्र भूषण मृदंग वादक गुरुवर्य ह.भ.प. श्री पांडुरंग अप्पा दातार यांना आरोग्याची अडचण निर्माण झाल्याने त्यांच्या पाठीशी खंभिर पणे उभे राहून त्यांना आर्थिक मदत देत देवस्थान ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
त्यावेळी ट्रस्ट चे ज्येष्ट विश्वस्त दिलीपराव मुरकुटे, विश्वस्त बबनराव चाकणकर, लक्ष्मण सायकर, उपाध्यक्ष राहुलजी पारखे, सचिव अनिकेत मुरकुटे, हिशोबतपासणीस मंगेश मुरकुटे, प्रवीण शिंदे, बापुसाहेब कळमकर उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या बाणेर येथिल श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र भूषण मृदंग वादक गुरुवर्य...