पोलीस भरती करीता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘स्वराज्य’ चा जाहिर पाठिंबा – डॉ. धनंजय जाधव

पुणे : पोलीस भरती करीता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘स्वराज्य’ चा जाहिर पाठिंबा दिला आहे असे स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी सांगितले

२०२२-२३ मध्ये होणारी पोलीस भरती परीक्षा महाराष्ट्र शासन २०२४ मध्ये घेत आहे. यामुळे २०२२-२३ च्या भरतीसाठी तयारी केलेले परंतु परीक्षा न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे वय नियमापेक्षा पुढे गेले आहे. शासनाच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.

त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या परंतु वय निघून गेलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी याकरिता ‘स्वराज्य’ च्या वतीने स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी पाठिंबा दिला.

See also  आरबीट्रेशन सेंटरचे माॅडर्न लाॅ काॅलेजमधे उद्घाटन