बाणेर : श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सेवा सप्ताहानिमित्त नामदार कॅबिनेट मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून रविवार २३ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
२३ मार्च रविवारी सकाळी ९.३० ते ५ अशी या एकदिवसीय शिबिराची वेळ असून कपिल ग्रेस बिल्डिंग पार्किंग, DSK गंधकोश शेजारी, प्रथमेश पार्क बाणेर परिसरात आयोजन आहे.
एकूण १३५०० रुपयांच्या विविध वैद्यकीय चाचण्या आणि ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत या शिबिरात मिळतील अशी माहिती आयोजक श्री सुभाष भोळ, सौ कल्याणी टोकेकर आणि सौ निकिता माताडे यांनी दिली.
विविध रक्त चाचण्या, रक्त कॉलेस्ट्रॉल प्रमाण, रकडब, दंत आरोग्य तपासणी, दातात सिमेंट भरणे, डोळे तपासणी काचबिंदू, मोतीबिंदू तपासणींनी गरजू व्यक्तींना मोफत चष्मे वाटप होणार आहे. या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे