सुतारवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष मयूर सुतार यांच्या वतीने नागरिकांसाठी तिकोणा किल्ला सहलीचे आयोजन

पाषाण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुतारवाडी शाखा अध्यक्ष मयूर भगवान सुतार यांच्या वतीने तिकोना किल्ल्याचे सहलीचे आयोजन नागरिकांसाठी करण्यात आले होते.

किल्ल्यावरती 75 वर्षाच्या मुंडे आजी त्याचप्रमाणे 62 वर्षाच्या जगदाळे आजी व दोन चार वर्षांची लहान मुले यांनी हा किल्ला सर केला. किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत किल्ला सर केला. शिवकालीन मंदिरामध्ये आरती करण्यात आली. गडावरती साफसफाई झाली ज्या मुलांनी जास्तीत जास्त साफसफाई केली त्या मुलांना शालेय भेटवस्तू देण्यात आल्या.

  तीकोणा किल्ला आठ किल्ल्यांवरती कशी निगराणी करायचा याची संपूर्ण माहिती तेथील किल्लेदार मोहोळ सर यांनी मुलांना दिली. या मोबाईलच्या युगामध्ये निसर्ग भटकंतीचा व इतिहास जाणून घेण्याचा एक चांगल्या प्रकारचा संदेश या ठिकाणी देण्यात आला.

See also  स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला