माय माऊली केअर सेंटरमध्ये मोफत आरोग्य शिबिर

कात्रज : माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय पुणे, समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावरील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित ,माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे याठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते यामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया, बीपी शुगर व हिमोग्लोबिन तपासणी, दंत तपासणी करण्यात आल्या कात्रज, कोंढवा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यामध्ये 128 रुग्णांनी सहभाग नोंदवला होता 103 दंतचिकित्सा, 19 नेत्र शत्रक्रिया केल्या जाणार आहेत.


या शिबिरामध्ये सर्व तपासणी व मार्गदर्शन करण्यात आल्या असून संबधित शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहेत. शिबिरात डेंटल तपासणी केलेल्या सर्व नागरिकांना तीन महिनेपर्यंत दांतचिकित्सा मोफत केली जाणार आहे.प्रसंगी माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन,केट्रॅक्ट ला.विठ्ठलराव वरुडे पाटील, ला.विशाल वरुडे पाटील ला.हेमलता जैन, तसेच आरोग्य शिबिरात सहभागी दंत चिकित्सा व नेत्र तपासणी विभागाचे डॉक्टर तसेच सहाय्यक कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी ला. विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की वर्षानुवर्ष अशा प्रकारचे आरोग्य शिबिरचे आयोजन केले जात असून यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक फायदा झाला त्याचबरोबर अनेक रोगावर मोफत व उत्तम उपचार मिळाले याचा मनस्वी आनंद आहे आणि हे काम निरंतरपणे चालू राहील असे आश्वासन दिले.

See also  स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती संवेदना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस