भूगाव : मुळशी तालुक्यामधील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या कडेने असलेल्या हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामांवर पीएमआरडी येणे दोन दिवस हातोडा चालवून अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.
यामध्ये प्रामुख्याने ठिकाणा, जे झेड, सरोवर, थलासो, रॉयल लेक, सीओटू, ओ एच तसेच एका नवीन सुरुवात होणाऱ्या हॉटेलच्या बांधकामावर सुरू होण्याआधीच पाडण्यात आले.साधारणपणे ३१२०४ चौ.फूट. क्षेत्रावरील अनधिकृत हॉटेल,पब, रेस्टॉरंट व बार पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. पुण्यामधील पोरशे कार अपघात प्रकरणानंतर मुळशी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या हॉटेलची चर्चा अनेक दिवस गाजत होती यावर कारवाई करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली होती त्यानुसार परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. यामध्ये रॉयल लेक या हॉटेलने तलावामध्ये अतिक्रमण केलेले सुद्धा पीएमआरडी कडून पाडण्यात आले.
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल,सहाय्यक आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे तसेच तहसीलदार मनीषा तेलभाते,तहसिलदार बजरंग चौगुले यांनी त्यांचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलिसांचा फौज फाटा घेत हॉटेलचे अनधिकृत बांधकामामध्ये चालणारे पब हुक्का बार जमीन दोस्त करून टाकले.त्यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागतील अधिकारी यांचे मार्फत सदर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम करू नये असे आवाहन करण्यात आले.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हद्दीतील उर्वरित सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई चालू राहील असे यावेळी पीएमआरडीए च्या वतीने सांगण्यात आले.