शासकीय तांत्रिक विद्यालय पुणे येथे संविधान मंदिराचे उद्घाटन

पुणे : महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि शासकीय तांत्रिक विद्यालयात एकाच वेळी संविधान मंदिराचे उद्घाटन  आभासी पद्धतीने  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले‌.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या संविधान मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी शासकीय तांत्रिक विद्यालय पुणे या संस्थेतील संविधान मंदिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यातील पुणे विभागाचे उपसंचालक चंद्रशेखर ढेकणे आणि सहाय्यक संचालक (अतांत्रिक) अतुल ढाणके उपस्थित होते. 

संस्थेचे मुख्याध्यापक सोमनाथ पुरी यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या शासकीय तांत्रिक विद्यालय पुणे या संस्थेतील संविधान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता पुणे महानगरपालिका माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, या संस्थेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक दिनेश सप्तर्षी तसेच लेखिका गीतांजली परदेशी  उपस्थित होत्या. जागतिक लोकशाही दिनानिमित्त करण्यात आलेल्या या संविधान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते मकरंद ढवळे यांनी आपल्या भाषणातून संविधान निर्मितीचा इतिहास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची मौलिक माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे मुख्याध्यापक सोमनाथ पुरी यांनी भारतीय संविधानाबाबत केलेल्या प्रस्ताविकेतुन सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही संविधानामुळे होते व त्यामुळे संविधानाबद्दल भावी पिढीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन या संस्थेत दिनांक 12 सप्टेंबर ते दिनांक 14 सप्टेंबर 2024 या कालावधीत संविधान महोत्सव आयोजित केला होता असे सांगितले. संविधान महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व उत्कृष्ट विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना याप्रसंगी संस्थेकडुन मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्ण वेळ शिक्षिका अनघा सांगरुळकर व पूर्णवेळ निदेशक एन बी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पूर्ण वेळ निदेशक शरद काळे यांनी मानले.

See also  कोणाची तरी तक्रार हवी तरच काम.. पुणे मनपा अधिकारी कर्मचारी मानसिकता बदलण्याची गरज..