मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह महाराष्ट्रातील सात जणांना ‘पद्म’ पुरस्कार

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्री. उन्मेश जोशी यांनी स्विकारला.

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव, जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा, डॉ. विलास डांगरे यांना वयाच्या ७० व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या ६८ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील  सहा मान्यवरांचा  समावेश आहे.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अन्य केंद्रीय मंत्रीगण  व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्री. उन्मेश जोशी यांनी स्विकारला.

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव, जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा, डॉ. विलास डांगरे यांना वयाच्या ७० व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

See also  जागा मालकाशी वाद न करता संवादातून काढला मार्ग ;दसरा चौक बालेवाडी येथील प्रलंबित रस्ता रुंदिकरण काम सुरू