राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरदचंद्र पवार) च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी सूरज पांडुरंग परदेशी यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे धनकवडी भागातील युवा कार्यकर्ते सूरज पांडुरंग परदेशी यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.  परदेशी यांची  निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरदचंद्र पवार) च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामधून प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी ही नियुक्ती केली आहे. परदेशी यांना निवडीचे पत्र महेबूब शेख  यांनी नुकतेच प्रदान करण्यात आले. सूरज पांडुरंग परदेशी  आणि त्यांचे कुटुंबीय मागील दोन दशकांहून अधिक काळ पक्षाच्या कार्यात सक्रिय आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सूरज पांडुरंग परदेशी यांचे अभिनंदन केले आहे.

See also  गायकांना करिअरसाठी योग्य संधी आवश्यक - अनुराधा मराठे