एकता सेवा प्रतिष्ठान’कडून शालेय साहित्य वाटप

गुलटेकडी: एकता सेवा प्रतिष्ठान व श्रीमद राजचंद्र मिशन धरमपुरच्या वतीने गुलटेकडी परिसरातील जवळपास २०० विदयार्थ्यांना शालेय साहित्य आणि बैग ,वही , कंपास पेटी , पॅट विविध महापुरुषांचे पुस्तक वाटप करण्यात आले. ईयत्ता १ पहीली ते आणि १२ वी च्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. हा कार्यक्रम मुंकुद नगर येथील संपोजो अश्राम येथे घेण्यात आला.

यावेळी रणजीत बाफना  यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘आई आणि बाप समजून घेताना’ या विषयावर भाषण केले.

प्रास्ताविक आयेजक गणेश शेरला यांनी केले.अध्यक्ष सचिन खंडागळे यांनी स्वागत केले. यावेळी संजय बोरा,डाॅ प्रसाद खंडागळे,तुकाराम डुबेकर ,अभय बोरा , मारुती कांबळे ,महेश साळुंखे ,प्रदीप वर्मा पप्पु लांगे व गणेश शेरला यांच्या माध्यमातून आदीच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

See also  बालभारती ते पौडफाटा रस्त्यासंदर्भात सर्वंकष चर्चा