मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. त्यासाठी सरकार गंभीर आहे. मराठा आरक्षणासाठी शक्य तितके प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय का घेतला नाही. असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यासंर्दभात महत्वाच्या बाबी सुप्रिम कोटासमोर आणणार असून मराठा समाजाने आता संयम बाळगावा. अशी विनंती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलीय.
जालन्यातील घटनेचं आमच्याकडून समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. आज आणि यापुर्वीही मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधला आहे. आजपर्यंत मराठा समाजाने अनेक शांततेत आंदोलने केली आहेत. परंतु सध्या काहींकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आहे. यातच या आंदोलनात ज्या लोकांवर केस दाखल केल्या आहेत.त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील.
जालन्यातील घटनेबाबत एसपीला सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं आहे. त्याची अंमलबाजावणी देखील सुरूय. उपविभागीय अधिकाऱ्यांना निलंबित केलं असून याची सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस महासंचालकांद्वारे चौकशी सुरू आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.