महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे.

राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. महामंडळाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली असून पुणे जिल्ह्यात १६ एप्रिलपर्यंत १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

कोणत्या आगारात किती लाभार्थी:
जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून १ लाख १६ हजार, स्वारगेट १ लाख ७ हजार, भोर १ लाख ५५ हजार, नारायणगाव २ लाख ८९ हजार, राजगुरुनगर २ लाख २८ हजार, तळेगाव ७५ हजार, शिरुर १ लाख १८ हजार, बारामती २ लाख २८ हजार, इंदापूर १ लाख ७१ हजार, सासवड ९० हजार, दौंड ६३ हजार, पिंपरी-चिंचवड ५१ हजार, एमआयडीसी ८२ हजार असे एकूण जिल्ह्यात १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला ६ कोटी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

See also  भोर मधील माजी आमदार शंकर भेलके, यांचे नातू अनिल भेलके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश